Posts

शिवउद्योग सरकार सेने तर्फे शेतकऱ्यासाठी जनजागृती मोहीम

Image
पुणे, दि. १५ (प्रतिनिधी) - शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेतर्फे राज्यातील गरीब शेतकरी, मालमत्ताधारक यांच्या जमिनीबाबत भेडसावणाच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिवउद्योग सहकार सेनेचे उपाध्यक्ष हर्षद नेगिनहाळ, सहचिटणीस योगेश भिंगानिया, चिटणीस अनिल हातागळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संदर्भात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनेकदा जमिनीच्या कागदपत्रे मिळविण्यात गोरगरीब शेतकरी, मालमत्ताधारकांची फसवणूक होते. या निवेदनामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ३२७ अन्वये जमीन, मालमत्ताविषयक कागदपत्रे, दस्तावेज, उतारे, सनदा, न्यायालयीन कागदपत्रे, निकाल ही सार्वजनिक कागदपत्रे आहेत आणि साक्षीपुरावा कायद्याचे कलम ७४ प्रमाणे जमिनीची कागदपत्रे आणि नकाशे सार्वजनिक बागदपत्रे असून, या सार्वजनिक कागदपत्रांमधील मजकूर सिद्ध करण्यासाठी त्याच्या प्रमाणि

शेतकरी जनजागृती मोहिम ..

Image
नवीन नाशिकादि १४ प्रतिनिधी शेतक-यांना अनेक वेळा जमिनीच्या संदर्भातील कामे करतांना शासकीय कार्यालयांमध्ये त्रास होत असतो. शेतक-यांना होणाच्या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेच्या वतीने शेतकरी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती सहकार सेनेचे अध्यक्ष डॉ. हेमंत दिक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी डॉ. दिक्षित यांनी सांगितले की, शेतक-यांना महसूले विभागाकडून मोठ्याप्रमाणावर फसवणूक होत असते. शेतक-यांना अनेक वेळा मोठमोठ्या फसवणूका सामोरे जावे लागत असते. सध्या महसुल विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे कामच शिवउद्योग सहकार सेना करणार आहे. शासनाने अनेक योजना तयार केल्याचा गाजावाजा सुरु केला असला तरी प्रत्यक्षात या योजना शेतक-यांपर्यंत पोहचतच नाही. त्यामुळे शेतक-यांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्याचे कामही करणार असल्याचे डॉ. दिक्षित यानी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष हर्ष द नेगिनहाळ, दिपक पताडे, दिपक मोरे, योगेश भिगानिया, जिल्हाध्यक्ष शांताराम ठाकरे, उत्तम दोंदे, जिल्हा चिटणीस उन्मेश कुलकर

शिवान्न उपक्रमातून बेरोजगारांना संधी...

Image
पुणे - शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेच्या वतीने शिवान्न हा नवा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात फिरते उपहार केंद्र, पोळी भाजी केंद्र, अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, बचत गट निर्मित खाद्यपदार्थ, शेतीमाल असे अनेक उद्योगांचा समावेश आहे. या उपक्रमात सहभागी होणा-या उमेदवारांची प्रथम मुलाखत घेतली जाणार आहे. या मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या पात्रतालायक उमेदवारांची एखाद्या व्यवसायाकरिता निवड केली जाणार आहे. त्यानंतर त्या उमेदवारांना व्यवसायाशी निगडीत मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना संस्थेतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्यातही येणार आहे. या उपक्रमाचा सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवउद्योग सहकार सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हर्षद नेगीनहाळ यांनी केले आहे. अर्जुन डांगळे यांना रमाबाई पुरस्कार पुणे - महामाता रमाईमाता भीमराव आंबेडकर स्मारक । समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवातंत यंदाचा अन्नामाना मामाई धीमान

शेतकऱ्याना फसवणाऱ्या मल्टी लेवल मार्केटिंगवर कारवाई करा

Image

शिवउद्योग सहकार सेनेतर्फे शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन

Image
पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील युवकांना शेतीला सक्षम जोडधंदा मिळावा, यासाठी शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेतर्फे ‘शिवछत्रपती महाराज ग्रामविकास योजनेअंतर्गत शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन सुरू करण्यात आले. शेळीपालनातून रोजगारनिर्मिती आणि व्यवसायासाठी तरुणांना प्रोत्साहित करावे, यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत नुकतेच पुण्यात प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शिवउद्योग सहकार सेनेचे उपाध्यक्ष हर्षद नेगीनहाळ यांनी या शिबिरामध्ये तरुणांना मार्गदर्शन केले. शेळीपालनातून स्वयंरोजगारनिर्मिती उपक्रमामध्ये प्रामुख्याने बंदिस्त शेळीपालन आणि त्याद्वारे मिळणारे उत्पन्न या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ९९२२७३८१७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दै.सामना २७.८.२०१४

शिवउद्योग सहकार सेनेतर्फे ग्रामविकास योजना ...

Image
Add caption पुणे, दि. २५ (प्रतिनिधी) - हिंदुस्थानात नैसर्गिक आपत्ती, शासकीय योजनांचा अभाव, मानवनिर्मित आपत्ती, महागाईमुळे होणाच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेच्या वतीने शिवछत्रपती महाराज ग्रामविकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, पर्यावरण विकास, विविध तंत्रज्ञान विषय राबविण्यात येणार आहे. शिवउद्योग सहकार सेनेचे उपाध्यक्ष हर्षद नेगिनहाळ यांनी या योजनेची संकल्पना मांडली असून, अध्यक्ष डॉ. हेमंत दीक्षित, सरचिटणीस ऑल्विन वाझ यांनी मार्गदर्शन केले आहे. ही योजना महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानात लवकरच कार्यन्वित होईल, असे पत्रकाद्वारे कळविले आहे. ६. सामना २७.६.२०१४

बेरोजगारीवर उपाय शिवसेना शिवात्र

Image
नागपूर मुंबईतील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने 'शिव वडापाव' योजना आणली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना उत्तम रोजगार देण्यासोबतच शेतक-यांचे भले करण्यासाठी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात ‘शिवान्न’ योजना घेऊन येत असल्याची माहिती शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हर्षद नेगिनहाळ यांनी ‘दिव्य मराठी'ला दिली. या योजनेअंतर्गत फिरते उपाहारगृह, पोळीभाजी केंद्र तसेच झुणका-भाकर केंद्र सुरु करण्यात येईल. याशिवाय बचत गट निर्मित खाद्यपदार्थ, फळप्रक्रिया उद्योग, खाद्यपदार्थ उत्पादकांसाठी बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या सहा मोठ्या शहरांत एक सेंट्रल किचन तयार केले जाणार आहे. या मध्यवर्ती स्वयंपाकघरासाठी लागणारा भाजीपाला थेट स्थानिक शेतक-यांकडून विकत घेण्यात येईल. त्यानंतर मध्यवर्ती स्वयंपाकघरात पोळी-भाजी, नाश्ता तसेच झुणकाभाकर तयार करण्यात येऊन सुशिक्षित बेरोजगारांना विक्रीसाठी देण्यात येईल. यात शेतक-यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात य