शिवउद्योग सहकार सेनेतर्फे ग्रामविकास योजना ...

Add caption
पुणे, दि. २५ (प्रतिनिधी) - हिंदुस्थानात नैसर्गिक आपत्ती, शासकीय योजनांचा अभाव, मानवनिर्मित आपत्ती, महागाईमुळे होणाच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेच्या वतीने शिवछत्रपती महाराज ग्रामविकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, पर्यावरण विकास, विविध तंत्रज्ञान विषय राबविण्यात येणार
आहे. शिवउद्योग सहकार सेनेचे उपाध्यक्ष हर्षद नेगिनहाळ यांनी या योजनेची संकल्पना मांडली असून, अध्यक्ष डॉ. हेमंत दीक्षित, सरचिटणीस ऑल्विन वाझ यांनी मार्गदर्शन केले आहे. ही योजना महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थानात लवकरच कार्यन्वित होईल, असे पत्रकाद्वारे कळविले आहे.

६. सामना २७.६.२०१४

Comments

Popular posts from this blog

शेतकरी जनजागृती मोहिम ..