शिवउद्योग सहकार सेनेतर्फे शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन
पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील युवकांना शेतीला सक्षम जोडधंदा मिळावा, यासाठी शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेतर्फे ‘शिवछत्रपती महाराज ग्रामविकास योजनेअंतर्गत शेळीपालन व्यवसाय मार्गदर्शन सुरू करण्यात आले.
शेळीपालनातून रोजगारनिर्मिती आणि व्यवसायासाठी तरुणांना प्रोत्साहित करावे, यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत नुकतेच पुण्यात प्रशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. शिवउद्योग सहकार सेनेचे उपाध्यक्ष हर्षद नेगीनहाळ यांनी या शिबिरामध्ये तरुणांना मार्गदर्शन केले. शेळीपालनातून स्वयंरोजगारनिर्मिती उपक्रमामध्ये प्रामुख्याने बंदिस्त शेळीपालन आणि त्याद्वारे मिळणारे उत्पन्न या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ९९२२७३८१७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दै.सामना २७.८.२०१४
Comments
Post a Comment