शेतकरी जनजागृती मोहिम ..

नवीन नाशिकादि १४ प्रतिनिधी
शेतक-यांना अनेक वेळा जमिनीच्या संदर्भातील कामे करतांना शासकीय कार्यालयांमध्ये त्रास होत असतो. शेतक-यांना होणाच्या त्रासातून त्यांची सुटका करण्यासाठी शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेच्या वतीने शेतकरी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती सहकार सेनेचे अध्यक्ष डॉ. हेमंत दिक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी डॉ. दिक्षित यांनी सांगितले की, शेतक-यांना महसूले विभागाकडून मोठ्याप्रमाणावर फसवणूक होत असते. शेतक-यांना अनेक वेळा मोठमोठ्या फसवणूका सामोरे जावे लागत असते. सध्या महसुल विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे कामच शिवउद्योग सहकार सेना करणार
आहे. शासनाने अनेक योजना तयार केल्याचा गाजावाजा सुरु केला असला तरी प्रत्यक्षात या योजना शेतक-यांपर्यंत पोहचतच नाही. त्यामुळे शेतक-यांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्याचे कामही करणार असल्याचे डॉ. दिक्षित यानी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष हर्ष द नेगिनहाळ, दिपक पताडे, दिपक मोरे, योगेश भिगानिया, जिल्हाध्यक्ष शांताराम ठाकरे, उत्तम दोंदे, जिल्हा चिटणीस उन्मेश कुलकर्णी, राजेंद्र फड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दिंडोरी मतदार संघाच्या उपाध्यक्षपदी शरद दातीर यांची तर पूर्व नाशिक विधानसभा मतदार संघ उपाध्यक्षपदी दिपक मंडलिक यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

शिवउद्योग सरकार सेने तर्फे शेतकऱ्यासाठी जनजागृती मोहीम

बेरोजगारीवर उपाय शिवसेना शिवात्र

शिवान्न उपक्रमातून बेरोजगारांना संधी...