शिवउद्योग सरकार सेने तर्फे शेतकऱ्यासाठी जनजागृती मोहीम


पुणे, दि. १५ (प्रतिनिधी) - शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेतर्फे राज्यातील गरीब शेतकरी, मालमत्ताधारक यांच्या जमिनीबाबत भेडसावणाच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
शिवउद्योग सहकार सेनेचे उपाध्यक्ष हर्षद नेगिनहाळ, सहचिटणीस योगेश भिंगानिया, चिटणीस अनिल हातागळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संदर्भात पुण्याच्या विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनेकदा जमिनीच्या कागदपत्रे मिळविण्यात गोरगरीब शेतकरी, मालमत्ताधारकांची फसवणूक होते.
या निवेदनामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ३२७ अन्वये जमीन, मालमत्ताविषयक कागदपत्रे, दस्तावेज, उतारे, सनदा, न्यायालयीन कागदपत्रे, निकाल ही सार्वजनिक कागदपत्रे आहेत आणि साक्षीपुरावा कायद्याचे कलम ७४ प्रमाणे जमिनीची कागदपत्रे आणि नकाशे सार्वजनिक बागदपत्रे असून, या सार्वजनिक कागदपत्रांमधील मजकूर सिद्ध करण्यासाठी त्याच्या प्रमाणित प्रती १९७० मध्ये केलेल्या नियमानुसार महसूल विभागाने सादर कराव्या. याचबरोबर जमीन आणि मालमत्ताविषयक कागदपत्रे प्राप्त होतात त्या सर्व ठिकाणी योग्य त्या विहित कालावधीत योग्य फी घेऊन देण्यात यावीत. यासह प्रत्येक कागदपत्रांचे दरपत्रक सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लिहिण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

शिवउद्योग सहकार सेनेतर्फे ग्रामविकास योजना ...

शेतकरी जनजागृती मोहिम ..